पिंपळनेर: 101 वर्षापुर्वीच्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत झाले रुपांतर, पिंपळनेर शहराला मिळणार विकासाचा वेग
-अक्षय कोठावदे,(पिंपळनेर)
आमदार मंजुळाताई गावित आणि डॉ. तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नांमुळे साक्री विधानसभा मतदारसंघात १०१ वर्षापूर्वी स्थापन झालेली पिंपळनेर ग्रामपंचायतीचे आता नगरपरिषदेत रुपांतर झाले आहे. पिंपळनेरमधील पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केल्यानंतर अखेर कायापालट झाला आहे. ग्रामपंचायतीकडून नगरपरिषदेत रुपांतर झाल्यामुळे पिंपळनेर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येला रस्ते, वीज, शुद्ध पाणी आणि आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सुविधांची तरतूद करणे शक्य होईल. या सुधारणांमुळे रहिवाशांचे जीवनमान उंचावेल आणि शहराचा पुढील विकास होईल, अशी माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी दिली आहे.
स्थानिक ग्रामस्थांची, लोकप्रितिनिधींची ग्रामपंचायत सरपंच व सदस्य्, व्यापारी संघटना यांची गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज मान्यतेचे आदेश शासनाने पारित केले आहेत. पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे म्हणून गावित यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे सो यांचेकडे दि.27-9-2021 रोजी प्रथम प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव, पंचायत समिती साक्रीचा ठराव, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव, भूमी अभिलेख साक्री यांचेकडून आवश्य्क असलेला पिंपळनेरचा गाव नकाशा नगर भूमापन हद्दीत येणारे सर्व्हे / गट नं. यांची माहिती, ग्रामपंचायतीची लोकसंख्या, नगरपरिषद स्थापना करण्यास आवश्य्क असलेले ना हरकत प्रमाणपत्र, अकृषीक रोजगाराची टक्केवारी, मा.जिल्हाधिकारी यांचे स्वयंस्पष्ट् अभिप्राय, कागदपत्रांची जुळवाजुळव करुन धुळे जिल्हाचे नव नियुक्त् मा. जिल्हाधिकारी श्री गोयल यांचे स्वयंस्पष्ट् अभिप्राय इ. कागदपत्रांचे अडथळे यांचे सतत पाठपुरावा करुन प्राप्त् करुन घेतले आणि दि. 23/8/2023 रोजी परिपुर्ण प्रस्ताव नाशिक विभागाचे आयुक्त् यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाचे म. उपसचिव यांचेकडे समक्ष सादर केला. आणि आज 101 वर्षापुर्वी स्थापन झालेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव मा. मुख्यमंत्री यांनी मंजूर केला आहे.
101 वर्षापुर्वी स्थापन झालेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर झाल्याने शहराची हद्दवाढ होईल, रस्ते, पुल, मोऱ्या, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची सोय इ. कामांसाठी विकासाचे दालन खुले होणार, नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मा. मुख्यमंत्री यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध करुन घेऊ व पिंपळनेर शहराच्या विकासात वाढ होणार असल्याची प्रतिक्रीया शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी व्यक्त् केली असून हे सारे श्रेय आमदार सौ. मंजुळाताई गावित यांचे आहे ,अशी माहिती मिळतेय.
101 वर्षापुर्वीच्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अभिनव गोयल व त्यांचे सर्व सहकारी तसेच पिंपळनेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, साक्री तालुक्यातील सर्व अधिकारी, मंत्रालयातील उपसचिव, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी वृंद आणि मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आमदार सौ. मंजुळाताई तुळशिराम गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
(Pimpalner Gram Panchayat was converted into Municipal Council)